वेंगुर्ल्यातील रंबलर्स हटवा अन्यथा आंदोलन 

वेंगुर्ल्यातील रंबलर्स हटवा अन्यथा आंदोलन 

वेंगुर्ले 


      शहरातील प्रमुख रस्त्यांवर बसवलेले रंबलर्स तात्काळ हटवावेत, अशी मागणी जय हनुमान मित्रमंडळ, जुना स्टँड यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांना निवेदन दिले.शिरोडा नाका, दाभोली नाका ते बंदर रोडवर वेग नियंत्रणासाठी रंबलर्स बसवले आहेत. मात्र त्यामुळे छोट्या वाहनचालकांना त्रास होत असून वाहनांची दुरवस्था होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.आठ दिवसांत रंबलर्स हटवावेत, अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदारी नगरपरिषदेची राहील, असा इशारा मंडळाने दिला आहे. तसेच सुशोभीकरणासाठी बसवलेले पथदीप रोज सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू ठेवावेत, अशी मागणीही करण्यात आली.यावेळी माजी नगरसेवक नागेश उर्फ पिंटू गावडे, विकी गावडे, कृष्णा गावकर, अनुप गावडे, गोट्या गावडे, सुमित गावडे, विकास कोरगावकर, गौरव गिरप, दीपेश गावडे, रोशन गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.