पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांची सावंतवाडी नगरपालिकेला सदिच्छा भेट

पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांची सावंतवाडी नगरपालिकेला सदिच्छा भेट

सावंतवाडी

 

      सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी नुकतीच सावंतवाडी नगरपालिकेला विशेष सदिच्छा भेट दिली. यावेळी नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे सावंत भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.या भेटीप्रसंगी तरुण भारतचे संपादक श्री. शेखर सामंत आणि ॲड. नकुल पार्सेकर हे देखील उपस्थित होते.या सदिच्छा भेटीदरम्यान पोलीस अधीक्षक डॉ. दहिकर आणि नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शहरातील कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियंत्रण तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. शहराचा विकास आणि नागरिकांची सुरक्षा या मुद्द्यांवर प्रशासन व पोलीस विभाग यांच्यात उत्तम समन्वय राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.याप्रसंगी मुख्याधिकारी श्री. विनायक औंधकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, उद्यान सभापती मोहिनी मडगावकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, तसेच नगरसेविका नीलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुनीता पेडणेकर, सुकन्या टोपले, देवेंद्र टेमकर, सिद्धार्थ भांबुरे, स्नेहा नाईक यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.