कणकवली करंजे येथील गोवर्धन गोशाळेचा उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कणकवली
कणकवली तालुक्यातील करंजे येथील कै. तातू सीताराम राणे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून व कु.अभिराज निलेश राणे याच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या गोवर्धन गोशाळेचा शुभारंभ ११ मे ला दुपारी १ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी याप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, नितेश राणे, शिक्षक प्रसारक मंडळ अध्यक्ष निलम राणे, प्रियांका राणे, ऋतुजा राणे, अभिराज राणे, निमिश राणे यांनी केले आहे.