शाळेचा पहिला दिवस.....नवा उत्साह नवी उमेद

शाळेचा पहिला दिवस.....नवा उत्साह नवी उमेद

 

       नवीन पुस्तक, नवीन शिक्षक, नवीन वर्ग आणि नवीन मित्र यांचा संगम होतो तो शाळेच्या पहिल्या दिवशी. या दिवशी प्रत्येकाच्या मनात नवा उत्साह आणि नवी उमेद जागृत होते. आपल्या शाळेचा पहिला दिवस ही एक नवीन सुरुवात असून प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात एक खास आणि अविस्मरणीय दिवस असतो.राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळा आज पासुन सुरू झाल्यात.आदल्या दिवशी रात्री मुले बॅग, गणवेश आणि सर्व वस्तू तयार करण्याच्या लगबगीत असतात. सकाळी लवकर उठून सगळ आवरावर शाळेत कधी पोहोचतोय अस काहीस झालेल असत. त्यावेळी त्यांच्या मनात थोडी भीती आणि थोडा आनंद याच कोड असत. शाळेच्या व्हरांड्यात  नुसता गजबज आणि येणाऱ्या सर्व नवीन आणि मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांचे शिक्षक आनंदाने स्वागत करतात.शाळेचा हा पहिला दिवस स्वप्नांची सुरुवात घेऊन येतो. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात यशस्वी होण्याची नवी उमेद जागते. काही विद्यार्थ्यांना कदाचित आधीच्या वर्षी काही अडचणी आले असतील पण पहिल्या दिवशी  ते सर्व अडचणींना मागे टाकून नवीन उमेदीने पुढे जाण्यास तयार असतात.शाळा म्हणजे नुसते शिक्षणाचे ठिकाण नाही,  तर जीवनाचे धडे शिकण्याचे उत्तम व्यासपीठ आहे. येथे शिकलेल्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देतात. त्या दिवशी मिळणारा आनंद, उत्साह आणि उमेद संपूर्ण वर्षभर टिकून राहावी, अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. हा दिवस म्हणजे जीवनातील एक सुंदर आणि प्रेरणादायी अनुभव आहे. 

''शाळा म्हणजे केवळ अभ्यास नव्हे, तर आयुष्य घडविण्याचे एक सुंदर विश्व''