सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी समिल जळवी

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी समिल प्रभाकर जळवी यांची महासंघाचे अध्यक्ष हेमंत करंगुटकर व पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत बिनविरोध निवड करण्यात आली. जळवी हे गेली अनेक वर्षें सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे तसेच कुडाळ तालुका भंडारी महासंघाच्या समाजाचे तळमळीने आणि निस्वार्थी कार्यपद्धतीने काम करत होते.त्यांचा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी समाज बांधवांसोबतचा संपर्क दांडगा आहे.त्यामुळे भंडारी समाजाला एकत्रित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून त्यांची भंडारी समाजाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
यावेळी महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा सदस्य आणि कार्यकारणी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.भंडारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष हेमंत करंगुटकर, पदाधिकारी रमण वायंगणकर, सरचिटणीस हेमंत सावंत, कुडाळ तालुका अध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर, श्रीकांत वेंगुर्लेकर, मालवण तालुका अध्यक्ष रविंद्र तळशीलकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, विकास वैद्य, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख समिल जळवी, राजु गवंडे, सुनिल नाईक, भरत आवळे, प्रियदर्शन कुडव, नामदेव साटेलकर, मनोहर पालयेकर, लक्ष्मीकांत मुंडये अन्य भंडारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.