टेबल टेनिस स्पर्धेत इशांत वेंगुर्लेकर व आर्या दिघेचे यश.

मालवण.
डेरवण येथे श्री.विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट अकॅडमी आयोजित डेरवण युथ गेम्स २०२४ मधील खुल्या टेबल टेनिस स्पर्धेत मालवणच्या खेळाडूंनी चमक दाखवत उत्तम कामगिरी केली. यामध्ये १७ वर्षाखालील मुलांच्या गटात कु. इशांत वेंगुर्लेकर याने उपविजेतेपद पटकाविले. तर कु. आर्या दिघे हिने १३ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये कांस्यपदक मिळविले. कु. लौकिक तळवडेकर याने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.
प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या टेबलटेनिस स्पर्धेत बहुसंख्य स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत मालवण मधून इशांत वेंगुर्लेकर, आर्या दिघे, लौकिक तळवडेकर पावनी मालणकर, वर्षा परुळेकर, प्राची चव्हाण, प्रज्वल नामनाईक यांनी सहभाग घेतला होता. विजयी आणि सहभागी स्पर्धकांचे महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री. विष्णू कोरगांवकर आणि सचिव श्री. हेमंत वालकर यांनी अभिनंदन केले आहे.