भाजपचे आचरा गावचे माजी सरपंच मंगेश उर्फ जिजा टेमकर व माजी सरपंच प्रणया टेमकर यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.

मालवण.
तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी भाजप पक्षाचे आचरा गावचे माजी सरपंच मंगेश उर्फ जिजा टेमकर, माजी सरपंच प्रणया टेमकर यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक व जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
यावेळी मंगेश टेमकर यांना होऊ घातलेल्या आचरा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सरपंच पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. आचरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
पक्षप्रवेश करतेवेळी मंगेश टेमकर म्हणाले की, आपली मुलगी भाजप पक्षाचा सरपंच असतानाही माजी खासदार निलेश राणे व दत्ता सामंत यांना सांगितलेले एकही विकासकाम त्यांनी केले नाही उलट जाणीवपूर्वक आपणास डावलले जात होते. मात्र आ. वैभव नाईक हे त्यावेळी विरोधक असूनही आमची विकास कामे मार्गी लावत होते म्हणूनच आपण शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, नितीन वाळके,युवासेना समन्वयक मंदार ओरसकर, युवतीसेना प्रमुख शिल्पा खोत, विभागप्रमुख समीर लब्दे, शंकर मिराशी, उदय दुखंडे, नारायण कुबल, विनायक परब, समीर हडकर, शाम घाडी अनुष्का गावकर, भाई कासवकर, चंदन पांगे, दिलीप कावले यांसह शिवसेना, युवासेना, महिलाआघाडी व युवतीसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.