अन्न व औषध प्रशासनामार्फत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षा जनजागृती मोहीम
सिंधुदुर्ग
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत कुडाळ येथे रोजी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे मिठाई व अन्य खाद्यपदार्थांमध्ये खाद्यरंगांचा सुरक्षित वापर, निर्धारित मर्यादांचे पालन तसेच सुट्या मसाल्यांची विक्री व खरेदी करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत व्यापारी आणि नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. दिवाळीच्या काळात मिठाई, फराळ आणि विविध खाद्यपदार्थांची मागणी वाढते. या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता राखणे महत्त्वाचे आहे. खाद्यपदार्थ आकर्षक दिसण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खाद्यरंगांचा वापर करताना निर्धारित मर्यादांचे पालन करणे आवश्यक आहे. अनधिकृत खाद्यरंगांचा वापर किंवा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक रंगांचा वापर केल्यास अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे खाद्यपदार्थ तयार करताना व विक्री करताना नियमांचे पालन करण्याबाबत व्यापाऱ्यांना माहिती देण्यात आली. याशिवाय सुटे मसाले खरेदी-विक्री करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबतही जनजागृती करण्यात आली. मसाल्यांची गुणवत्ता, स्वच्छता, सुरक्षित साठवणूक आणि विक्रीसाठी आवश्यक असलेल्या अन्नसुरक्षा नियमांचे पालन करण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. नागरिकांनी मसाले व अन्य खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले. अन्नपदार्थांची गुणवत्ता व सुरक्षितता राखण्यासाठी अन्न व्यवसायातील सर्व घटकांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. सुरक्षित अन्न सेवनाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि अन्न भेसळीस प्रतिबंध करण्यासाठी व्यापारी व ग्राहकांचा सहभाग वाढविणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनामार्फत ही जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत आणि अन्नसुरक्षेबाबत जनजागृती वाढावी, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
konkansamwad

