पुजारेवाडी युवकांचे श्रमदान; बाजारपेठेकडील अंतर्गत रस्ता स्वच्छ
पुजारेवाडी युवकांचे श्रमदान; बाजारपेठेकडील अंतर्गत रस्ता स्वच्छ
आचरा
आचरा बाजारपेठेकडून आचरातिठा कावलेदुकानकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची सफाई पुजारेवाडी येथील युवकांनी श्रमदानातून केली. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आठवडा बाजार किंवा इतर वेळी देऊळवाडी भागातून आचरा तिठा मार्गे बाजारपेठेत जाण्यासाठी हा रस्ता अत्यंत उपयुक्त आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याच्या कडेला झाडे आणि वेली वाढल्याने वाहनचालक, पादचाऱ्यांसह सरपटणाऱ्या जनावरांपासूनही धोका निर्माण झाला होता.ही बाब लक्षात घेऊन पुजारेवाडीतील युवकांनी पुढाकार घेत एकत्र येऊन रस्त्यावरील झाडे-झुडपे, वेली आणि कचरा हटवून संपूर्ण रस्ता स्वच्छ केला.या श्रमदानात रुपेश पुजारे, शरद पवार उर्फ बंडो, आनंद पेंडूरकर, रामचंद्र पुजारे, राहुल पुजारे, दुर्गेश पुजारे, रितेश पुजारे, अमोल गुरव, मनोज पुजारे, विघ्नेश पवार, यश पाल, अक्षय पुजारे, हरीश परब, हर्शद पेंडुरकर, जय घाडी, रुद्र घाडी यांच्यासह इतर युवक सहभागी झाले होते.रस्ता स्वच्छ झाल्याने आता नागरिकांना आणि बाजारपेठेत येणाऱ्या ग्रामस्थांना ये-जा करणे सुलभ झाले आहे. युवकांच्या या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक होत आहे.
konkansamwad 
