सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र 'सह्याद्रीरत्न' पुरस्काराने सन्मानित
पुणे
श्री. महादेव धोंडू वेळकर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, मुंबई ही आपली कर्मभूमी सोडून आपल्या गावात काही तरी करावे, या विचाराने कोकणात आपल्या गावी स्थायिक झाले. लालमातीला एकरूप व्हावे या इच्छेने आपले ग्रामीण जीवन सुरू केले. त्यातूनच ज्ञानदानाचे काम सुरू करत ग्रामीण भागातील शाळांमध्ये कराटे खेळाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. ज्यात ते यशस्वीही झाले आणि गाव खेड्यातील शालेय विद्यार्थ्यांना तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर भरघोस पुरस्कार प्राप्त करून नावारूपास आणले. त्यांच्या या सामाजिक ज्ञानदानाचा विचार करून टॅलेंट कट्टा, महाराष्ट्र या संस्थेने त्यांना पुणे येथे, सह्याद्रीरत्न या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले. डॉ. नीता जोशी (प्रसिद्ध शास्त्रज्ञ), प्राध्यापक डॉ. संदीप सांगळे (मराठी अभ्यासक) आणि डॉ.नितीन धवणे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झालेला हा सन्मान सत्कार सोहळा पाहून तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक आणि शिक्षकेतर वर्ग, विद्यार्थ्यी आणि पालकवर्ग महादेव वेळकर यांचे अभिनंदन करत आहेत.

konkansamwad 
