कराड येथील कर्तबगार महिला पोलिसांचा अहिल्यारत्न पुरस्कार देऊन सन्मान

कराड
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्यावतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन कराड तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आले असून याप्रसंगी कराड तालुका पोलीस स्टेशनमधील ९ कर्तबगार महिला अधिकारी यांना अहिल्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अखंड देशांमध्ये समाज उपयोगी कामे केली. आजही त्यांच्या विचारानुसार आदर्शानुसार या देशांमध्ये कारभार सुरू आहे अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे नेतृत्वगुण, मुत्सद्दीपणा, ज्ञानलालसा, झुंज घेण्याचा खंबीरपणा, प्रजाहित, अचूक न्यायगुण, संरक्षण व्यवस्था, गुप्तहेर खाते, स्वाभिमान, राज्यकारभाराची जाण, रणकौशल्य, बाणेदार वृत्ती, साधीराणी आणि कल्याणकारी विचारसरणी असे अनेक सदगुण होते. त्यांच्या दानधर्माचा सामाजिक कार्याचा वसा व वारसा अखंडपणे चालू आहे. यावेळी अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीने सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन अहिल्यारत्न पुरस्कार सहायक पोलिस निरीक्षक तब्बसुम शादीवान, जयश्री वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शारदा आमले, पीएसआय रेखा देशपांडे, पीएसआय शीतल पाटील, पीएसआय शितल माने, ट्राफिक पोलिस सोनम पाटील, निर्भय पथकाच्या दिपाली पाटील यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी अहिल्यादेवी ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण काकडे, एपीआय बिराजदार, कराडचे माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबासो गावडे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अजीव सदस्य प्राचार्य उत्तमराव गलांडे, कराड तालुकाध्यक्ष सतीश थोरात, विश्वास चौगुले, बाबासो काकडे, अवधुत पाटील, मंदार कदम, सुरेश काकडे, अर्जुन राव चव्हाण इत्यादी उपस्थित होते.