आर्किटेक्ट शंकर सावंत यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न
कुडाळ
कुडाळ - साद फाउंडेशन चे पदाधिकारी आर्किटेक्ट शंकर सावंत यांचा वाढदिवस नुकताच तेरसे बांबर्डे येथील नाग्या महादू वसतिगृहातील मुलांच्या बरोबर साजरा करण्यात आला. यावेळी वसतिगृहातील संयोजक उदय अहिर, साद फाउंडेशन अध्यक्षा तथा प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक-सावंत, खजिनदार गौरेश नाईक, प्रवीण कोरगावकर उपस्थित होते. वाढदिवसाचे औचीत्य साधून वसतिगृहातील मुलांना बॅडमिंटनचे सेट, अब्दुल कलाम यांची तसेच करिअर साठी मार्गदर्शनपर पुस्तके, मुलींना आवश्यक असणारे दैनंदिन वापरातील वस्तू तसेच १० किलो पोहे, १० किलो साखर, बिस्कीटपुडे आणि तन्वी सावंत यांच्यामार्फत जुने कपडे देण्यात आले. जर्मन येथील नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत असणाऱ्या इंजिनीअर भाग्यश्री राऊळ-पावसकर तसेच भोसले पॉलिटेक्निक येथील प्रोफेसर स्वप्नील राऊळ यांच्या देणगीतून वह्या भेट देण्यात आल्या. एकूण ७५ मुलांना वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अविस्मरणीय आणि शब्दात न सांगण्यासारखा होता. तसेच यावेळी मुलांना त्यांच्या भावी आयुष्या विषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
konkansamwad 
