श्रद्धा कदम सलग सहाव्या वर्षी एमडीआरटी.

श्रद्धा कदम सलग सहाव्या वर्षी एमडीआरटी.

कणकवली.

   विमा क्षेत्रात गेली २६ वर्षे कार्यरत असलेल्या कणकवली येथील एलआयसी शाखेच्या विमा प्रतिनिधी सौ. श्रद्धा एस. कदम यांनी विमा क्षेत्रातील बहुमानाचा “ एमडीआरटी ” हा सन्मान प्राप्त केला असून यावर्षी सिंधुदुर्गातून त्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत. त्यांचा हा पुरस्कार एलआयसी वेस्टर्न झोनचे व्यवस्थापक कमल कुमार यांनी कोल्हापूर येथील हॉटेल सयाजी येथे सन्मानपूर्वक जाहीर केला.
   सौ. कदम या हा बहुमानाचा पुरस्कार गेली सहा वर्ष सातत्याने पटकावत आहेत. ग्रामीण भागातील सामान्य व्यक्ती ही ग्राहक म्हणून डोळ्यासमोर ठेवून त्या काम करत असून सेवा,विश्वासहर्ता आणि कर्तव्याचे जोरावर त्यांनी आपल्या कामाचे जाळे शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात जोडले आहे.त्यांच्या या यशाबद्दल एलआयसी कणकवली शाखाधिकारी दशरथ कुंभार यांनी सौ.कदम यांचा सहकुटुंब सत्कार करून, त्यांच्या कार्याचे कौतुक व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
   यावेळी विकास अधिकारी श्रीनिवास पलसुले, अनिल गांधी, श्री. माळी, प्रशासकीय अधिकारी सुनील भोगले, सह.प्रशासकीय अधिकारी ओमकार शिरसेकर,श्रीकृष्ण पाटकर व शाखेतील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.