डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त मालवण येथे विविध कार्यक्रम
मालवण
भारतीय बौद्ध महासभा डॉ. राजरत्न आंबेडकर गाव शाखा चौकेच्या वतीने, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३६ वी जयंती १४ एप्रिल २०२६ रोजी उत्साहात साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने 'सम्यक नगर समाज मंदिर, चौके' येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच रात्री भव्य जिल्हास्तरीय वैयक्तिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.जयंती उत्सवाचे औचित्य साधून दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दुपारी १२ वाजता पंचशील व पूजाविधी, दुपारी स्नेहभोजन आणि करमणूक कार्यक्रम,सायंकाळी जाहीर सभा, रात्री ७:३० वाजता जिल्हास्तरीय वैयक्तिक नृत्य स्पर्धा होईल. ही स्पर्धा खुल्या गटासाठी असून विजेत्यांना रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम पारितोषिक ७,७७७ रुपये व आकर्षक चषक (दिवंगत दिनकर बाबाजी चौकेकर यांच्या स्मरणार्थ), द्वितीय पारितोषिक ५,५५५ रुपये व आकर्षक चषक (दिवंगत रमेश गंगाराम चौकेकर यांच्या स्मरणार्थ), तृतीय पारितोषिक ३,३३३ रुपये व आकर्षक चषक (दिवंगत हिरोजी शिवराम जाधव – राठीवडेकर यांच्या स्मरणार्थ) दिले जाईल. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. प्रवेश फी ५०० रुपये असून प्रथम नोंदणी करणाऱ्या २० स्पर्धकांनाच प्राधान्य दिले जाईल. नावनोंदणीसाठी १२ एप्रिल २०२६ पर्यंत मुदत आहे. संपर्क समीर चौकेकर (८२०८६७३८८२) किंवा रुपेश जाधव (९०४९६७७११७) यांच्याकडे आपली नावे नोंदवावीत. असे आवाहन करण्यात आले आहे.या स्पर्धेच्या संयोजनाची जबाबदारी ॲड. अशोक चौकेकर, नागेश चौकेकर आणि रुपेश जाधव सांभाळत आहेत. या भव्य दिव्य कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गाव शाखेच्या प्रभारी अध्यक्षा अनिता अनंत चौकेकर आणि सचिव संजय दुलाजी चौकेकर यांनी केले आहे.
konkansamwad 
