प्रमोद कामत यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट

प्रमोद कामत यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट

 

सावंतवाडी

 

   भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची केसरी येथे सदिच्छा भेट घेतली. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रमोद कामत यांनी ही पहिलीच औपचारिक भेट घेतली असून, यावेळी दोघांमध्ये जिल्ह्याच्या विकासकामांच्या संदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सध्या जिल्हा दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान ही भेट पार पडली. या भेटीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवायचे नवीन प्रकल्प, ग्रामीण भागातील प्रलंबित विकासकामे आणि प्रशासकीय गतिमानता यावर विशेष भर देण्यात आला. नवनिर्वाचित अध्यक्षांनी प्रत्यक्ष भेट घेऊन मार्गदर्शन घेतल्याने आगामी काळात जिल्ह्यातील विकासकामांना मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.