कुडाळ येथील हिर्लोक गावात दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

कुडाळ येथील हिर्लोक गावात दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

 

कुडाळ

 

         महात्मा गांधी सेवा संघ संचलीत दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने कुडाळ तालुक्यातील हिर्लोक पंचक्रोशीतील सर्व दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये हिर्लोक गावचे सरपंच प्राची सावंत, बचतगट महिला CRP व ग्रामपंचायत कर्मचारी, जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे, कर्मचारी प्रणाली दळवी, संजना गावडे, दीपक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या वतीने स्वागत समारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अनिल शिंगाडे आणि सरपंच प्राची सावंत यांनी दिव्यांगांना मार्गदर्शन केले. कर्मचारी दळवी यांनी दिव्यांग बांधवांना गाडीसाठी फॉर्म दिले व त्यासंबंधी सर्व माहिती सांगितली. चार दिव्याग बांधवांचे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे घेण्यात आली. या मेळाव्यामध्ये निलेश नाईक यांना व्हीलचेअर देण्यात आली असून अक्षय तावडे यांना पंचायत समितीच्या माध्यमातून तीनचाकी गाडी मिळवून देण्यात आली. पुनर्वसन केंद्र व हिर्लोक सरपंच प्राची सावंत यांनी अक्षयचे अभिनंदन केले व गाडीला हार व श्रीफळ अर्पण करून गाडीचे उद्घाटन केले. मेळाव्याला 40 हून जास्त दिव्यांग बांधव उपस्थित होते. दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.