श्री देवी सोमजाई देवस्थान पालखी उत्सव सोहळा

श्री देवी सोमजाई देवस्थान पालखी उत्सव सोहळा

मुंबई

 

  नवसाला पावणारी आई श्री देवी सोमजाई देवस्थानच्यावतीने पालखी उत्सव सोहळा आयोजित करण्यात आले आहे. वाकी बुद्रुक तालुका: महाड, जिल्हा: रायगड, दरवर्षीप्रमाणे आईचा शिमगोत्सव मंगळवार दिनांक ०३/०३/२०२६ ते बुधवार दिनांक ११/०३/२०२६ पर्यंत आईचा उत्सव थाटामात, भक्तीभावाने, आनंदाने व एकजुटीने साजरा होणार आहे. श्री देवी समजाई ही स्वयंभू व पुरातन जागृत देवस्थान आहे. देवीचा महिमा आपल्या सर्व भक्तांना ज्ञात आहे. कोकणात शिमगोत्सवला खूप महत्त्व आहे, होळीच्या सुरुवातीपासून ते पालखी मिरवणूक व विसर्जन होईपर्यंत हा उत्सव आनंदाने संपन्न होतो.पालखी सजावट करुन मंदिराला भेट व प्रदक्षिणा घालून प्रत्येक गावात प्रस्थान होते, यात ‌बारावाडीत पालखी मुक्कामाला असते, शेवते, गावठण, नानेमाची, नानेमाची आवाड, आंब्याचा माळ, खडकवाडी, रोहिदास वाडी, शेंदूरमळई, नारायणवाडी, नांद्रुकवाडी, पेडामकरवाडी, शिवाजीनगर येथे संपूर्ण गावात पालखी मिरवणूक फिरवली जाते, पालखी वस्तीला असेल तेथे प्रत्येकांच्या घरी जाऊन आईची  खनानारळाची ओटी भरली जाते, आपली इच्छा नवस मागतात,  नवस फेडतात, मुंबईचे चाकरमनी असो, पुण्याच्या असो व इतर कुठलेही स्थानिक असो, सर्वजण येऊन पालखी भक्तीभावाने साजरी करतात, यात कोणताही भेदभाव नसतो, पालखीला आरती, भजन, कीर्तन, गजर व सर्वांसाठी तीर्थ प्रसादाचा लाभ असतो, रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना दर्शन दिला जातो, संपूर्ण पालखी मिरवणूक झाल्यावर पालखी गादीवर विसर्जन केली जाते, पालखीचे मानकरी तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, विश्वस्त, संपूर्ण पदाधिकारी, गावकरी आवर्जून उपस्थित असतात. यात श्री. सूर्यकांत कदम (अध्यक्ष) श्री. संजय गं. कदम (उपाध्यक्ष), श्री. विनोद भोसले (सचिव), सुधीर म्हामुणकर (खजिनदार) व विश्वस्त गावकरी मंडळी उपस्थित राहून पालखीचे देखरेख करतात. अशा प्रकारे पालखी नाचवली व मिरवली जाते, आई सोमजाईचा उदो उदो करून जल्लोष केला जातो.