राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे १३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

मुंबई
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा राज्यभर दौरा सुरु असून ते १३ ऑगस्ट २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते महसूल विषयक लोकांच्या अडचणी समजून घेणार आहेत. तसेच प्रशासकीय बैठकही आयोजित करण्यात आली आहे. दौऱ्याची सुरुवात सकाळी ९.३० वाजता माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी भेटीने होईल. त्यानंतर, सकाळी १०.५५ वाजता त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन होईल. सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत ते नागरिकांची निवेदने स्वीकारतील.दुपारी १.०० ते ३.०० या वेळेत महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग, तसेच भूमी अभिलेख विभागाचा आढावा घेतील. त्यानंतर, दुपारी ३.१५ ते ४.१५ या वेळेत ते भाजपा जिल्हा कार्यालयाला भेट देणार आहेत.