सावंतवाडीत २७ डिसेंबरला सिंधू यंग चॅम्पियन्स रनची तिसरी आवृत्ती
सावंतवाडी
सिंधू रनर्स आणि स्पोर्ट्स फौंडेशन, सावंतवाडी पॅलेस बुटीक आर्ट हॉटेल आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने, सिंधू यंग चॅम्पियन्स रनची तिसरी आवृत्ती 27 डिसेंबर 2026 रोजी ऐतिहासिक सावंतवाडी राजवाड्यात आयोजित केली जाणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन देणे आणि युवकांमधील लपलेली क्रीडा प्रतिभा शोधणे हा आहे.या स्पर्धेत वयोगटानुसार चार धावण्याच्या श्रेणी असतील. 10 किमी रन ही श्रेणी 16 वर्षांपासून 19 वर्षांपर्यंतच्या धावपटूंसाठी असेल. 5 किमी रन ही श्रेणी 13 वर्षांपासून 16 वर्षांपर्यंतच्या धावपटूंसाठी असेल. 3 किमी रन ही श्रेणी 10 वर्षांपासून 13 वर्षांपर्यंतच्या धावपटूंसाठी असेल. 1.5 किमी रन ही श्रेणी 7 वर्षांपासून 10 वर्षांपर्यंतच्या धावपटूंसाठी असेल.स्पर्धेची वेळ अशी असेल. 10 किमी धावण्यासाठी सकाळी साडेपाच वाजता रिपोर्टिंग होईल आणि सकाळी 6 वाजता सुरुवात होईल. 5 किमी धावण्यासाठी सकाळी 6 वाजता रिपोर्टिंग होईल आणि सकाळी साडेसहा वाजता सुरुवात होईल. 3 किमी धावण्यासाठी सकाळी साडेसहा वाजता रिपोर्टिंग होईल आणि सकाळी 7 वाजता सुरुवात होईल. 1.5 किमी धावण्यासाठी सकाळी 7 वाजता रिपोर्टिंग होईल आणि सकाळी साडेसात वाजता सुरुवात होईल. स्पर्धेचे स्थळ सावंतवाडी राजवाडा, सावंतवाडी हे आहे.नोंदणी तपशील असा आहे. Instagram आणि Facebook वर Sindhu_Runners_07 या पेजला भेट देऊन नोंदणी करता येईल. नोंदणी शुल्क 10 किमी साठी 850 रुपये, 5 किमी साठी 750 रुपये, 3 किमी साठी 650 रुपये आणि 1.5 किमी साठी 550 रुपये असे आहे. सर्व नोंदणीकृत सहभागींना टी शर्ट, पदक आणि पूर्णता प्रमाणपत्र दिले जाईल. स्पर्धेदरम्यान पाणी आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील, तसेच स्पर्धेनंतर अल्पोपहार दिला जाईल.नोंदणी प्रक्रियेसाठी http://www.Sindhurunners.com या संकेतस्थळावर फॉर्म भरून नोंदणी करावी. फॉर्मसाठी क्यूआर कोड कार्यक्रमाच्या जाहिरात पोस्टर्सवर उपलब्ध आहे. नोंदणीची अंतिम तारीख 5 डिसेंबर 2026 आहे, त्यामुळे पालकांनी लवकरात लवकर आपल्या मुलांची नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.हे कार्यक्रम तरुण खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची आणि क्रीडाक्षेत्रात भविष्य घडवण्याची उत्तम संधी आहे, असे सिंधू रनर्स टीमने सांगितले. आम्ही सर्व तरुण धावपटूंना या रोमांचक दिवशी सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो आणि धावण्याचा आनंद अनुभवण्याचे आवाहन करतो, असेही टीमने म्हटले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क करावा
ओंकार पराडकर सावंतवाडी 9420307187
डॉ. स्नेहल गोवेकर सावंतवाडी 9422373922
डॉ. सोमनाथ परब मालवण 9764235276
डॉ. प्रशांत मडव कणकवली 9422963712
डॉ. प्रदीप वेंगुर्लेकर वेंगुर्ला 9420742440
सुजाता रासकर ओरोस 9527387727
भूषण बांदेलकर कुडाळ 9686601156
या उपक्रमामागील उद्दिष्ट म्हणजे धावणे या व्यायाम प्रकाराबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण करणे आणि आपल्या जिल्हा व राज्यातून देशाचे प्रतिनिधित्व करू शकणारे धावपटू घडवणे हे आहे. 2025 मध्ये सिंधू यंग चॅम्पियन्स रनमध्ये 340 मुलांनी सहभाग नोंदवला होता. यावर्षी 500 हून अधिक धावपटू सहभागी होतील अशी अपेक्षा आणि विश्वास सिंधू रनर्स आणि स्पोर्ट्स फौंडेशन टीमला आहे.आतापर्यंत या टीमने अनेक महत्त्वाच्या धाव स्पर्धांचे आयोजन केले आहे आणि त्यात सहभाग घेतला आहे. सावंतवाडी 12 तास रन 5 वेळा, गोवा ते सावंतवाडी 100 किमी रन 3 वेळा, मालवण ते सावंतवाडी आरमार रन 4 वेळा, 24 तास स्टेडियम रन, हिमालयन खारडुंगला अल्ट्रा रन 72 किमी, देहू ते पंढरपूर 266 किमी, टाटा अल्ट्रा मॅरेथॉन, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन, पुणे अल्ट्रा मॅरेथॉन, जम्पिंग गोरिला ट्रेल रन, लोकमत मॅरेथॉन, ठाणे हाफ मॅरेथॉन, टाटा मुंबई मॅरेथॉन, वसई विरार मॅरेथॉन, अदानी अहमदाबाद मॅरेथॉन, गोवा रिव्हर मॅरेथॉन, गोआ हाफ आयर्नमॅन, लोहपुरुष कोल्हापूर अशा अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपल्या जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवले आहे.2024 मध्ये सिंधू रनर्स टीममधील प्रसाद कोरगावकर आणि ओंकार पराडकर या दोन धावपटूंनी साऊथ आफ्रिका येथे झालेल्या जगप्रसिद्ध कॉम्रेड्स मॅरेथॉन मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून जिल्हा आणि देशाचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवले आहे.
konkansamwad 
