अयोध्येतील राम मंदिरातील चंदा चोरी प्रकरणाचा वेंगुर्ला काँग्रेसकडून निषेध

अयोध्येतील राम मंदिरातील चंदा चोरी प्रकरणाचा वेंगुर्ला काँग्रेसकडून निषेध

वेंगुर्ला

 

    अयोध्येतील भव्य राम मंदिरातील दानपेटी आणि देणग्यांच्या पैशांमध्ये झालेल्या कथित अपहार आणि चोरीच्या मुद्द्यावरून वेंगुर्ला येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप आणि आरएसएस (RSS) विरोधात 'रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन' केले.देशातील करोडो रामभक्तांच्या आस्थेचे केंद्र असलेल्या अयोध्या राम मंदिरातील चंदा चोरी प्रकरण आता थेट जनतेच्या दरबारात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार वेंगुर्ल्यात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत एक दिवसीय लाक्षणिक सत्याग्रह आंदोलन केले.आंदोलकांनी हातात 'राम मंदिराची लूट थांबवा', 'राम लल्ला का झंडा चोर कौन है?' अशा घोषणांचे फलक धरले होते. "राम मंदिरात झालेली ही चोरी म्हणजे केवळ पैशांची किंवा दागिन्यांची चोरी नाही, तर देशातील १४० कोटी जनतेच्या आस्थेवर आणि श्रद्धेवर केलेला हा दरोडा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपूर्ण मंदिराचे घाईघाईने उद्घाटन करून मोठे श्रेय घेतले, मग आता या चोरीवर ते मौन का बाळगून आहेत? असे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी प्रश्न उपस्थित केले.आमची मागणी आहे की या महाघोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे आणि चोरांना तात्काळ अटक झाली पाहिजे असेही ते पुढे म्हणाले