पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सावंतवाडीत उत्साहात साजरी
सावंतवाडी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी बोलताना उपस्थितांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजकारण, लोककल्याण आणि सुशासनाच्या माध्यमातून दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या कार्याचा आदर्श समाजातील प्रत्येक घटकाने घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.या कार्यक्रमास महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब, विकास परब, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगांवकर, सावंतवाडी शहर चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर, श्रीकांत राजाध्यक्ष, साईप्रसाद भोई, साई नाईक, योगेश पेंडसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला उजाळा देत त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
konkansamwad 
