कुडाळ पणदूर तिठा येथे हार्डवेअर दुकानाला भीषण आग
कुडाळ
कुडाळ तालुक्याच्या पणदूर तिठा येथील सिद्धिविनायक एंटरप्रायजेस या हार्डवेअर दुकानास आग लागण्याची घटना मध्यरात्री २ च्या सुमारास घडली. हे हार्डवेअर दुकान रत्नदीप सावंत यांच्या मालकीचे असून यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.
या दुकानास लागलेल्या आगीत प्लास्टिक, पाईप्स इत्यादी सामान मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. दुकानाला लागलेली आग एवढी मोठी होती की, लोखंडी पाईप्स, अँगल पूर्णतः वाकून गेले. तर या आगीत टाटा कंपनीच्या डीआय वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

konkansamwad 
