सामाजिक बांधिलकीच्या रुग्णवाहिकेसाठी रवींद्र चव्हाणांची मदत
सावंतवाडी
सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून शहरात घेण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकेसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक लाखाची मदत दिली आहे. गेल्या काही वर्षात सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने आरोग्य आणि समाजसेवा क्षेत्रात अत्यंत कौतुकास्पद काम केले आहे. या कार्याची माहिती मिळाल्यानंतर चव्हाण यांनी युवा कार्यकर्ते विनोद राऊळ यांच्या माध्यमातून ही मदत संस्थेकडे सुपूर्द केली.प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे आणि उपाध्यक्ष प्रा. शैलेश नाईक यांनी ही देणगी स्वीकारली.या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की, वरिष्ठ नेत्यांकडून मिळणारी ही शाबासकीची थाप आमच्यासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारी आहे. याप्रसंगी विनोद राऊळ, प्रा. सतीश बागवे आणि प्रा. शैलेश नाईक उपस्थित होते.
konkansamwad 
