दहावीचा निकाल जाहीर 

दहावीचा निकाल जाहीर 

मुंबई 


      १२वी प्रमाणेच दहावीचा निकाल देखील २ टक्क्यांनी घसरला आहे. कोकण निकालाचा सर्वात अव्वल लागला आहे, कोकण विभागाचा ९७.६२ टक्के लागला आहे.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (शुक्रवारी, ता ८) दुपारी १ वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर होणार आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालक गेल्या अनेक दिवसांपासून या निकालाच्या प्रतीक्षेत होते. बारावीचा निकाल (HSC Result 2026) लागल्यानंतर आज दहावीचा निकाल (SSC Result 2026)जाहीर होणार आहे. काल (गुरुवारी, ता ७) संध्याकाळी बोर्डाकडून निकालाबाबत घोषणा करण्यात होती. त्यानुसार आज दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर आणि अन्य वेबसाईटवर ऑनलाईन निकाल (SSC online result) पाहता येईल. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे गुण दिसतील. विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका शाळेतून मिळेल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधील विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.(Maharashtra Board Exam Latest news) बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन दहावीच्या निकालाबाबतची माहिती दिली. राज्याचा दहावीचा निकाल ९२.०९ टक्के इतका लागला आहे. 12वी प्रमाणेच दहावीचा निकाल देखील २ टक्क्यांनी घसरला आहे. कोकणचा निकाल सर्वात अव्वल लागला आहे, कोकण विभागाचा ९७.६२ टक्के लागला असून छत्रपती संभाजीनगरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. छत्रपती संभाजीनगरचा निकाल ८८.४१ टक्के इतका लागला, अशी माहिती त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली आहे. SSC Exam Result 2026: दहावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून त्यांची टक्केवारी ९४.९६ टक्के आहे.