ध्वनीक्षेपक वापरण्याच्या निर्बंधातून सवलत
सिंधुदुर्ग, दि. २७
ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2000 तसेच पर्यावरण विभागाच्या शासन निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात सन 2026 मध्ये सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरण्याच्या निर्बंधातून सवलत देण्याबाबत जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यापूर्वी दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी आदेश जाहीर केले आहेत. यानुसार सप्टेंबर महिन्यात दि. 5 सप्टेंबर 2026 रोजी गोपाळकाला/दहीहंडी, दि. 18 सप्टेंबर 2026 रोजी गणेश उत्सव (पाचवा दिवस), दि. 20 सप्टेंबर 2026 गणेश उत्सव (सातवा दिवस), दि. 25 सप्टेंबर 2026 अनंत चतुर्दशी या दिवशी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरण्याच्या निर्बंधातून सवलत देण्यात आली आहे. ध्वनीक्षेपकाचा वापर करताना निर्धारित ध्वनीमर्यादांचे पालन करणे बंधनकारक असून, उच्च न्यायालयाच्या आदेशांचे किंवा ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची संबंधितांनी दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
konkansamwad 
