गणित प्रज्ञा प्रमाणपत्र धारक चैतन्य परुळेकर याचा परुळे ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार.

परुळे
महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ मार्फत इयत्ता ५ वी साठी गणित प्रज्ञा परीक्षा २०२२ -२३ मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत कु. चैतन्य सुहास परुळेकर राज्यातून गणित प्रज्ञा प्रमाणपत्र धारक झाला होता. या परीक्षेचे बक्षिस वितरण ओरोस येथे पार पडले. जिल्हा परिषद केंद्र शाळा परुळे नंबर 3 चा विद्यार्थी कु.चैतन्य सुहास परुळेकर याला हे यश र्मिळाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने प्रजासत्ताक दिनी सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दूधवडकर, ग्रामसेवक शरद शिंदे, तलाठी श्री. गवते, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप प्रभू, प्राजक्ता पाटकर, पूनम परुळेकर, नमिता परुळेकर, अभय परुळेकर, सुनाद राऊळ, सीमा सावंत, सामुदाय आरोग्य अधिकारी डॉ काजल परब, मुख्याध्यापक प्रविणा दाभोलकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सानिका परुळेकर, आरोग्य सेवक एस आर. चव्हाण, शिक्षक पाटील, दत्तात्रय म्हैसकर, रविन्द्र गोसावी, कोतवाल स्वप्निल वरक, पशुवैद्यकीयचे अजित चव्हाण, आप्पा राठीवडेकर यांच्या सह विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.