वाफोली येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; दोघे जण ताब्यात. एकूण १० लाख ८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त.

वाफोली येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; दोघे जण ताब्यात.  एकूण १० लाख ८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त.

सावंतवाडी.

    राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली या पथकाने बांदा ओटवणे रोड, डोंगरीकर हॉटेलजवळ वाफोली, ता.सावंतवाडी येथे महिंद्रा कंपनीचे सफेद रंगाचे मालवाहतुकीचे बोलेरो पिकअप वाहन क्र. MH-47 - Y-1917 या वाहनाची तपासणी केली असता सदर मालवाहतुकीच्या वाहनाच्या हौद्यामध्ये कांद्याच्या गोणी भरलेल्या दिसुन आल्या. गोव्याहुन होणाऱ्या कांदा वाहतुकीबाबत संशय आल्याने सदर वाहनाची कसुन तपासणी केली असता सदर गोण्यांचे खाली लपवुन ठेवलेला गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे 50 बॉक्स व बिअरचे 30 बॉक्स असा एकुण 80 बॉक्स अवैध मद्यसाठा मिळून आला.
     यामध्ये 5 लाख 47 हजार 200 रुपये किंमतीचे मद्य व 4 लाख 50 हजार रुपये किंमतीचे चारचाकी वाहन व 10 हजार 800 रुपये असे मिळून एकुण 10 लाख 8 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह धोडीराम लिंबाजी गायकवाड, वय 42 वर्षे, रा. कैलाश भवन, 243, घोडबंदर रोड, शिवसेना ऑफिस जवळ, मीरा रोड ईस्ट (घोडबंदर) ठाणे, मीरा रोड व  विशाल मारुती पठारे, वय 43 वर्षे, रा. हनुमान टेकडी, चाळ नं.8, विवानी इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेगाव (ई) मुंबई यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
   सदर कारवाई दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, दुय्यम निरीक्षक प्रदीप रास्कर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान दिपक वायदंडे, जवान नि.वाहन चालक रणजीत शिंदे, यांनी केली.सदर प्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक तपासणी नाका इन्सुली तानाजी पाटील, हे करीत आहेत.