आंबोली धबधब्यावर पर्यटकांची अफाट गर्दी

आंबोली धबधब्यावर पर्यटकांची अफाट गर्दी

 

सावंतवाडी


 

        पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आंबोलीतील मुख्य धबधब्यावर पर्यटकांनी तुफान गर्दी केलेली पहावयास मिळाली. यावेळी मुख्य धबधब्याचा परिसर पर्यटकांनी फुलून गेला होता. कावळेसाद पॉईंट तसेच मुख्य धबधब्याच्या परिसरात वाहनांचे पार्किंग फूल झाले होते. परंतु पोलीस बंदोबस्त असल्याने वाहतूक कोंडी कमी प्रमाणात झाली. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण स्वतः पेट्रोलिंग करीत असल्याने पोलिस धीर ठेवून होते. मद्यपी पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी आंबोली पोलीस व्हॅन पेट्रोलिंग करीत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.