देवगड तालुक्याचा दहावीचा निकाल ९८.५२ टक्के

देवगड तालुक्याचा दहावीचा निकाल ९८.५२ टक्के

 

देवगड

 

     माध्यमिक शालांत परिक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल ९८.५२ टक्के लागला असुन तालुक्यातील ३२ हायस्कूलांपैकी २१ हायस्कुलांचा निकाल १०० टक्के लागला आहे. उमा मिलींद पवार देवगड इंग्लिश मिडीयम स्कूल या प्रशालेचा विद्यार्थी पियुष सुनिल राठोड ९८.८० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम तर शेठ न.ग. हायस्कूल देवगडची विद्यार्थीनी सारा जावेद खान ही ९८.६० टक्के गुण मिळवून द्वितीय व जामसंडे श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कुलची विद्यार्थीनी लोचन भगत व आदर्श विद्यामंदीर या हायस्कूलची विद्यार्थीनी कुमारी आर्या पोईल यांनी ९७ टक्के गुण मिळवुन तालुक्यात तृतीय क्रमांक पटकाविला आहे. परीक्षेला एकूण १३५४ विद्यार्थी प्रणिष्ठ झाले होते त्यापैकी १३३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष श्रेणीत ३०२, प्रथम श्रेणीत ५२५, द्वितीय श्रेणीत ३५३ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.