दोडामार्ग तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.७४ टक्के

दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.७४ टक्के लागला असून दोडामार्ग इंग्लिश स्कूल दोडामार्गचा विद्यार्थी हर्ष महेश कासार याने ९६.६० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळविला आहे. करुणा सदन इंग्लिश मीडियम स्कूल साटेली भेडशीची विद्यार्थिनी उज्वला पुरुषोत्तम देसाई ९६.२० टक्के गुण मिळवत द्वितीय तर कीर्ती विद्यालय घोटगेवाडीचा विद्यार्थी सौरभ प्रकाश देसाई ९५.८० टक्के गुण मिळवत तालुक्यात तृतीय आले आहेत. तालुक्याचा निकाल 99.74% लागला असून तालुक्यात माटने वगळता सर्व शाळा 100% टक्के निकाल लागला आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.