वेंगुर्ला येथे २२ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

वेंगुर्ला येथे २२ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

 

वेंगुर्ला
 

     रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी आणि गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्रामार्फत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर 22 जून 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत साई मंगल कार्यालय येथे होणार असून शिबिरात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.रक्तदान हे श्रेष्ठदान असून प्रत्येक निरोगी व्यक्तीने रक्तदानासाठी पुढे येऊन जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी 9420258640, 9823109475 या क्रमांकावर संपर्क साधावा.