वेंगुर्लेतील दोन अधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने गौरव

वेंगुर्लेतील दोन अधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने गौरव

 

 

वेंगुर्ला

 

         वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतीचे अधिकारी शरद श्रीरंग शिंदे आणि मेढा ग्रामपंचायतीचे अधिकारी तसेच केळुस ग्रामपंचायतीचे अधिकारी विवेक रमेश वजराटकर यांना यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानाअंतर्गत राज्यस्तरावर केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते या दोन्ही अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम आणि प्रधानसचिव एकनाथ डवले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. परुळेबाजार व मेढा ग्रामपंचायतीचे अधिकारी श्री. शिंदे यांना सन २०२२-२०२३ या वर्षासाठी, तर केळुस ग्रामपंचायतीचे अधिकारी श्री. वजराटकर यांना सन २०२३-२०२४ या वर्षासाठी राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्कारांचे वितरण नुकतेच राज्यपालांच्या हस्ते संपन्न झाले. या दोन्ही अधिकाऱ्यांनी राज्यस्तरावर मिळवलेल्या या गौरवामुळे त्यांचे जिल्हा तसेच तालुकास्तरावर अभिनंदन होत आहे.महाराष्ट्र शासन दरवर्षी जिल्हा परिषद स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा या पुरस्काराने सन्मान करते. कोकण विभागातून आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या दोन अधिकाऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती. वेंगुर्ले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांनी दोन्ही अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले आहे.