आजगाव येथील त्या उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

आजगाव येथील त्या उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
आजगाव येथील त्या उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

सावंतवाडी.

   तालुक्यातील आजगाव शाळा नंबर १ परिसरात आज सकाळी पासूनच कोल्हापूर पोलिसांचे वाहन उभे असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र स्थानिक पोलीस प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता पोलीस प्रशासनाकडे कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले जात आहे.संबंधित वाहनांतील पाच पोलीस कर्मचारी हे सिव्हील ड्रेस मध्ये असल्याने नेमके वाहन कशासाठी उभे आहे? नेमका शोध कोणाचा? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.या परिसरात कोल्हापूर जिल्ह्यातील कामगार मोठ्या प्रमाणात असल्याने येथील चिरेखाण व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.