खर्डेकर महाविद्यालय आयोजित आंतरवर्गीय शरीर सौष्ठव स्पर्धेत वरिष्ठ विभागातून अथर्व पालव तर कनिष्ठ विभागातून पवन कांबळे प्रथम.

खर्डेकर महाविद्यालय आयोजित आंतरवर्गीय शरीर सौष्ठव स्पर्धेत वरिष्ठ विभागातून अथर्व पालव तर कनिष्ठ विभागातून पवन कांबळे प्रथम.
खर्डेकर महाविद्यालय आयोजित आंतरवर्गीय शरीर सौष्ठव स्पर्धेत वरिष्ठ विभागातून अथर्व पालव तर कनिष्ठ विभागातून पवन कांबळे प्रथम.

वेंगुर्ला.

  येथील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात युवा महोत्सवानिमित्त कै.काकासाहेब चमणकर स्मृतीप्रित्यथ 'श्री. जगदीश चमणकर पुरस्कृत किशोर सोन्सुरकर सातेरी व्यायामशाळा मार्गदर्शित आंतरवर्गीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उ‌द्घाटन प्रा. वामन गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तर पंचायत समिती माजी सभापती जयप्रकाश चमणकर यांच्या शुभ हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले तसेच स्थानिक सल्लागार समिती सदस्य सुरेंद्र खामकर, व आंतरराष्ट्रीय हॉलीबॉल पंच अशोक दाभोलकर, यांच्या हस्ते हनुमानच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला.’बॅ खर्डेकर श्री’ ही स्पर्धा गेली २६ वर्षे सातत्याने महाविद्यालयात होत आहे. विद्यार्थ्यांनो, आपले कर्तव्य, जबाबदारी ओळखा आपल्यासाठी शिक्षणक्षेत्रात वेगवेगळी दालने खुली आहेत, सामाजिक बांधिलकी ठेवा, प्रगल्ब विचारसारणी बाळगा, वाईट प्रवृत्तीपासून दूर रहा, आपण उद्याचे भारताचे नागरीक आहात, राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपल्या महाविद्यालयाचे नांव उज्वल करावे असे प्रतिपादन जयप्रकाश चमणकर यांनी या प्रसंगी सांगितले.
  यावेळी माजी सभापती पंचायत समिती, वेंगुर्ला, अभिषेक चमणकर व प्राचार्य एम्.बी.चौगले व सुरेंद्र चव्हाण यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. व आपले मनोगत व्यक्त केले.
  या कार्यक्रमास ऐश्वर्य चमणकर, किशोर सोन्सुरकर, प्रा. डि.जे.शितोळे, (ज्युनियर कॉलेज पर्यवेक्षक), प्रा.देवीदास आरोलकर, सौ. आबोली सोन्सुरकर, प्रा.संजय चमणकर, प्रा. विरेंद्र देसाई, प्रा.बी.जी. गायकवाड व प्रा. हेमंत गावडे आदी प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी पंच म्हणून किशोर सोन्सुरकर महाराष्ट्र कामगार श्री विजेते व अंकित सोन्सुरकर यांनी काम पाहिले.
   शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव  जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सील मेंबर दौलतराव देसाई, प्रशासन अधिकारी, प्रा. डॉ.सौ. मंजिरी मोरे देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन क्रिडा संचालक प्रा. जे.वाय. नाईक यांनी केले. व प्रा.हेमंत गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. वरील मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. सदर स्पर्धा किशोर सोन्सुरकर सातेरी व्यायामशाळा येथे घेण्यात आली. सदरच्या स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्हा बॉडीबिल्डर्स असोसिएशनचे सहकार्य लाभले.

बॅ.खर्डेकर श्री विजेते स्पर्धक खालीलप्रमाणे-

वरिष्ठ विभाग -

सिनियर बॅ. खर्डेकर श्री- प्रथम क्रमांक कु. पालव अथर्व मंगेश (एफ.वाय बी.कॉम), द्वितीय क्रमांक कु. गावडे शंकर लवू (एस. वाय. बी.कॉम), तृतीय क्रमांक कु. उत्सव लक्ष्मण गुरुनाथ (टी.वाय.बी.कॉम).

ज्युनियर विभाग -

ज्युनियर बॅ. खर्डेकर श्री - प्रथम क्रमांक कु. कांबळे पवन बबन (१२वी एम.सी.वी सी) द्वितीय कु.सावंत यश शंकर (१२ वी), कु. देऊळकर स्वर्णिम अभिषेक  (११वी एम.सी.व्ही सी).