कणकवली नगरपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर
कणकवली
कणकवली नगरपंचायतीच्या १७ प्रभागांसाठी नगरसेवक पदाची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. प्रांताधिकारी जगदीश कातकर व मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोडत कार्यक्रम पार पडला.या सोडतीनुसार प्रभागांचे आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित झाले आहे.
प्रभाग क्रमांक आरक्षण प्रकार
1 सर्वसाधारण
2 सर्वसाधारण महिला
3 सर्वसाधारण
4 नामनिर्देशित प्रवर्ग महिला
5 नामनिर्देशित प्रवर्ग महिला
6 सर्वसाधारण महिला
7 नामनिर्देशित प्रवर्ग महिला
8 अनुसूचित जाती
9 सर्वसाधारण महिला
10 सर्वसाधारण महिला
11 अनुसूचित जाती महिला
12 सर्वसाधारण महिला
13 नामनिर्देशित प्रवर्ग
14 नामनिर्देशित प्रवर्ग
15 सर्वसाधारण
16 सर्वसाधारण
17 सर्वसाधारण
या आरक्षण सोडतीमुळे अनेक दिग्गज इच्छुकांना धक्का बसला असून काहींना पुन्हा संधी मिळाली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीचे पडघम आता वाजायला सुरुवात झाली आहे. काहींना नव्या प्रभागांतून उमेदवारीची जुळवाजुळव करावी लागणार आहे. कार्यक्रमाला माजी नगरसेवक तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षण जाहीर होताच काहींच्या चेहऱ्यावर आनंद झळकला, तर काहींच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.

konkansamwad 
