श्री देव उपरलकर देवस्थानाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

सावंतवाडी.
सावंतवाडी संस्थान ३६५ खेड्यांचा अधिपती आणि जागृत देवस्थान म्हणून परिचित असलेल्या तसेच रक्षणकर्ता व नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या सावंतवाडी येथील श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक उत्सव आज दिनांक १ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली असल्याचे दिसून येत आहे. तसेच धार्मिक कार्यक्रमांना सुद्धा सुरुवात झाली आहे. दरम्यान सावंतवाडीतील राजकारण्याचे दैवत असलेल्या श्री देव उपरालकर देवाचा उत्सव दरवर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री दशावतार नाटक होणार आहे. त्या व्यतिरिक्त विविध भजनांचे आयोजन करण्यात आले आहे.तरी भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानाच्या वतीने करण्यात येत आहे.