ठाणे येथे अवैध मद्यसाठा जप्त......उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

ठाणे
ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गोवा निर्मित भारतीय बनावटीची विदेशी मद्याची (IMFL) बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनावर मोठी कारवाई करत 800 बॉक्सचा मद्यसाठा जप्त केला. मुंब्रा येथील अमित गार्डनजवळ राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार, अधीक्षक प्रविण तांबे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली. भरारी पथकाने टाटा 1613 सहाचाकी टेम्पोची (MH-05-AM-1265) तपासणी केली असता या वाहनात गोव्यातून ठाण्यात आणलेले विदेशी मद्य आढळून आले.याप्रकरणी 800 बॉक्स मद्य तसेच टेम्पो असा एकूण 63,98,400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहनचालक जुल्फेकार ताजअली चौधरी याला अटक करण्यात आली आहे. निरीक्षक एम.पी.धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक एन.आर. महाले, आर.के.लब्दे, सहाय्यक दु.नि. बी.जी. थोरात व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली. अधीक्षक प्रविण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश धनशेट्टी हे पुढील तपास करीत आहेत.