दाभोली इंग्लिश स्कुल शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा वेंगुर्ला बँक ऑफ इंडिया तर्फे सत्कार

दाभोली इंग्लिश स्कुल शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा वेंगुर्ला बँक ऑफ इंडिया तर्फे सत्कार

 

वेंगुर्ला 

 

     सिंधुदुर्गातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रसिद्धी पावलेली एक उपक्रमशील शाळा म्हणून परिचित असणारी वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटी दाभोली इंग्लिश स्कुल दाभोली या शाळेतील माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी बँक ऑफ इंडिया शाखा वेंगुर्ला चे मुख्य व्यवस्थापक  फाल्गुनी मिश्रा, व्यवस्थापक प्रतीक अवस्थी व स्टाफ मेंबर सद्गुरू परब हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी शाळेमध्ये राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहशालेय उपक्रमामध्ये सहभाग घेऊन मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत एक उत्तम दर्जाचे शिक्षण या शाळेमध्ये दिले जाते असे शाखा व्यवस्थापक मिश्रा यांनी आपल्या भाषणातून व्यक्त करून शाळेला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर गोलतकर, नवजीवन वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश पालयेकर, शिक्षकेतर कर्मचारी, नितीन घोगळे, पालक परब आदि उपस्थित होते.याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या वतीने कु. तनया बोवलेकर हिने  बँकेचे आभार मानून आपण केलेले कौतुक आमच्यासाठी प्रेरणादायी आहे असे सांगितले.