वेंगुर्ला कॅम्प येथील फिरोज शेख यांचे हृदयविकारामुळे निधन

वेंगुर्ला कॅम्प येथील फिरोज शेख यांचे हृदयविकारामुळे निधन

 

वेंगुर्ला
 

      वेंगुर्ला कॅम्प गवळीवाडा येथील फिरोज शेख (५३) यांचे तीव्र हृदयविकारामुळे निधन झाले. ते वेंगुर्ल्यात गेल्या २० वर्षापासून रिक्षा चालकाचा व्यवसाय करत होते. वेंगुर्ला बाजारपेठ येथील श्री स्वामी समर्थ रिक्षा स्टँड युनियनचे ते सदस्य होते. नेहमी हसतमुख चेहरा, वागण्यात साधेपणा, आपल्या कामाशी प्रामाणिक असा त्यांचा स्वभाव होता.फिरोज यांच्या जाण्याने त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्यांची बायको, दोन मुले असा परिवार आहे.कॅम्प येथील F. R. गॅरेजचे मालक फरहान शेख यांचे ते वडील होत.