वैभव नाईक यांची जिल्ह्याचे दुसरे परशुराम उपरकर बनण्याच्या दिशेने वाटचाल.......आमदार निलेश राणे यांची पोस्ट चर्चेत

वैभव नाईक यांची जिल्ह्याचे दुसरे परशुराम उपरकर बनण्याच्या दिशेने वाटचाल.......आमदार निलेश राणे यांची पोस्ट चर्चेत

 

कुडाळ
 

         माजी आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुसरे परशुराम उपरकर बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत अशी टीका आमदार निलेश राणे यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून केली आहे.
      या पोस्टमध्ये राणे यांनी असे म्हटले आहे की, "माजी आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुसरे परशुराम उपरकर बनायच्या दिशेने वाटचाल करत आहेत. आपल्याला अनेकांना माहित नसेल परशुराम उपरकर म्हणजे कोण, राणे साहेबांच्या सोबत राहून उद्धव ठाकरेंना टीप देणारे हे शिवसैनिक होते त्यानंतर राणेसाहेबांनी शिवसेना सोडली त्या पोटनिवडणुकीमध्ये या उपरकरांचं डिपॉझिट जप्त झाल होत. उद्धव ठाकरेंनी उपरकरांना विधान परिषद दिली त्यानंतर हे महाशय मनसेत गेले. मनसेमध्ये गटबजी केली, राज साहेबांनी कार्यकारणी बरखास्त करून याची हकालपट्टी केली. हा उबाठात गेला आणि आज साधी ग्रामपंचायत निवडणूक लढू शकत नाही अशी राजकीय अवस्था परशुराम उपरकरची आहे. याचा एकच छंद राणे परिवारावर रोज उठून टीका करायची. आज बघायला गेल तर रिकामटेकडे असलेले वैभव नाईक हे परशुराम उपरकर यांच्या पावलावर पाऊल ठेऊन वाटचाल करत आहेत". वैभव नाईक, काहीतरी नवीन निर्माण करा, स्वतःच्या खिशात हात घाला आणि सिंधुदुर्गासाठी काहीतरी निर्माण करा. तोंडाच्या वाफा सोडून तुम्ही फक्त परशुराम उपरकर होऊ शकता, लोक तुमच नाव लक्षात ठेवतील अस कार्य काहीतरी उभ करा नाहीतर तुमची ओळख राणेंचे विरोधक हीच आयुष्यभर राहणार, अशी टीका आ. निलेश राणे यांनी माजी आमदार वैभव नाईक व परशुराम उपरकर यांच्यावर सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून केली आहे. जी सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.