भिवंडीत बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई

भिवंडीत बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई

 

मुंबई


         भिवंडीतून ४५ लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग युनिट दोन भिवंडीच्या पथकाने हस्तगत केल्या. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. बनावट नोटा बनविण्याचा छापखान्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. खऱ्या नोटांच्या बदल्यात खोट्या नोटा देणारी टोळी आली असल्याची माहिती भिवंडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून या प्रकरणातील सहा जणांच्या टोळीला जेरबंद केले. त्यांच्याकडून ४५ लाख ५० हजारांच्या बनावट नोटा, नोटा छापण्याची मशीन आणि अन्य साहित्य जप्त केले.यामुळे भिवंडीत बनावट नोटा पुरवणाऱ्या टोळीकडून या आधी कोणकोणत्या ठिकाणी बनावट नोटा पुरवण्यात आल्या आहेत का? त्यांचे नेटवर्क किती मोठे आहे. या टोळीसोबत आणखी कोणाचे लागेबांधे आहेत या गोष्टींचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.