मळगाव येथे किल्ले व ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन. अष्टविनायक कला-क्रीडा मंडळाचा अनोखा उपक्रम.

मळगाव येथे किल्ले व ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन.  अष्टविनायक कला-क्रीडा मंडळाचा अनोखा उपक्रम.

सावंतवाडी.

   तालुक्यातील मळगाव-रस्तावाडी येथील अष्टविनायक कला-क्रीडा मंडळाच्यावतीने एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. या मंडळाच्यावतीने मळगाव येथे प्रथमच किल्ले व ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या चार येत दिवसीय प्रदर्शनास मळगाव पंचक्रोशीतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर, मळगाव इंग्लिश स्कूलच्या माजी मुख्याधापिका प्रमिला राणे- सावंत, शिवप्रेमी पांडुरंग राऊळ, भूषण मांजरेकर, माजी सैनिक अंतोन फर्नाडिस, सामाजिक कार्यकर्ते सुभाष नाटेकर, अशोक राऊळ आदी उपस्थित होते. मळगाव येथील सुभाष नाटेकर यांच्या निवासस्थानी हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यात काही निवडक किल्ले प्रदर्शन, ऐतिहासिक वस्तू व माहिती यांचे प्रदर्शन, मातीपासून बनविलेल्या महाराष्ट्रातील काही निवडक गड-किल्ल्यांची प्रतिकृती व त्यांची माहिती तसेच ऐतिहासिक वस्तू व माहिती देण्यात आहे.तसेच शिवाजी महाराजांच्या काळातील काही पत्र या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.
    प्रदर्शन यशस्वीतेसाठी अष्टविनायक कला-क्रीडा मंडळ मळगाव रस्तावाडीचे अध्यक्ष तुळशीदास नाईक, उपाध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर सचिव उदय केंन्द्रे, खजिनदार संदेश सोनुर्लेकर, बाप्पा नाटेकर, सिद्धेश फेन्द्रे, चैतन्य नाटेकर, प्रथमेश खडपकर, अर्थव धुरी, मयुरेश नाईक, नीलेश नाटेकर, प्रसन्न सोनुर्लेकर, मनीष नाटेकर, ज्ञानेश्वर राणे, उमेश कोंड्ये, बाळा होळकर, नीलेश चव्हाण आदी मेहेनत घेत आहेत.