सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांना निवृत्ती सेवा पुरस्कार प्रदान

सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांना निवृत्ती सेवा पुरस्कार प्रदान

 

कणकवली 
     महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशन, पुणे यांचेकडून दिला जाणारा सन 2024 साठी मानांकित निवृत्ती सेवा राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशनचे राज्य अध्यक्ष एन. डी. मारणे यांच्या हस्ते पुण्यातील पद्मश्री आप्पा साहेब पवार सभागृहात भव्य सत्कारासह प्रदान करण्यात आला. कणकवली तालुका पेन्शनर असोसिएशन अध्यक्ष म्हणून केलेली स्पृहणीय कामगिरी तसेच इतर अनेक  संस्थानद्वारे केलेली अतुलनीय सामाजिक सेवेचा गौरव म्हणून हा निवृत्ती सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशनचे कार्याध्यक्ष वसंतराव वाबळे, सरचिटणीस लक्ष्मण टेम्बे सत्कारमूर्ती दादा कुडतरकर, सिंधुदुर्ग पेन्शनर संघटना जिल्हाध्यक्ष मनोहर आंबेकर, जेष्ट नागरिक सेवा संघ कुडाळ अध्यक्ष कोरगावकर, बबली वायंगणकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते, मेळाव्यास 900 ते 1000 पेन्शनर आवर्जून उपस्थित होते.यापूर्वीही हा राज्यस्तरीय पुरस्कार जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कारासह दि.17 डिसेंबर 2024 रोजी श्री. कुडतरकर यांना प्रदान करण्यात आला होता.