साटम महाराज पुण्यतिथी निमित्त इन्सुलीत आज विविध कार्यक्रम
सावंतवाडी
दाणोलीचे योगी परमपूज्य सद्गुरु श्री समर्थ साटम महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा गुरुवार, दिनांक ०५ मार्च रोजी इन्सुली येथील श्री साटम महाराज मठ, कै. रमेश नाटेकर यांच्या घराजवळ मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.पुण्यतिथी सोहळ्याचे औचित्य साधून सकाळी नऊ वाजल्यापासून विविध कार्यक्रम होणार आहे.सकाळी ९.०० वा: श्री सत्यनारायण महापूजा. दुपारी १२.०० वा: आरती व तीर्थप्रसाद. दुपारी १.०० वा: महाप्रसाद. सायंकाळी ६.०० वा: स्थानिक भजने.रात्री ९.०० वाजता सुधीर कलिंगण प्रस्तुत, श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांचा भव्य पौराणिक ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे. यावेळी 'एकपादा त्रिमूर्ती' अर्थात 'पृथ्वीकंकण' हे नाटक सादर केले जाणार असून दशावतार कलेची ही मेजवानी पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे
konkansamwad 
