आरोंदा येथे महिलांसाठी भीमगीत गायन स्पर्धेचे आयोजन
सावंतवाडी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून सावंतवाडी तालुक्यातील महिलांसाठी भीमगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.आरोंदा पंचशीलनगर येथील प्रज्ञा, चैतन्य आणि प्रगती महिला बचत गटांच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.ही स्पर्धा शुक्रवार, २४ एप्रिलला दुपारी ३ वाजता आरोंदा पंचशीलनगर येथील समाजमंदिरात पार पडेल. ही स्पर्धा केवळ सावंतवाडी तालुक्यातील महिला समूहांसाठी असून, सामाजिक प्रबोधन करणाऱ्या गीतांना यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कमेसह सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी ५,००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३,००० रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी २,००० रुपये देण्यात येतील. तसेच १,००० रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिकही ठेवण्यात आले आहे.या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक समूहात ५ ते १० महिला असणे आवश्यक आहे. गाण्यासाठी ६ ते ७ मिनिटांचा वेळ दिला जाईल. स्पर्धेची प्रवेश फी १०० रुपये असून, सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी २३ एप्रिलपर्यंत आपली नावे नोंदवणे गरजेचे आहे.अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संजना जाधव (७२६४०३७८२२) किंवा सिद्धार्थ जाधव (९६३७९०९२५२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. तालुक्यातील जास्तीत-जास्त महिला मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
konkansamwad 
