'ज्ञानेश्वर म्हात्रेंसारखा शिक्षक आमदार पाहिला नाही' - पानझडे यांचे गौरवोद्गार.....आंबोली सैनिक स्कूलमध्ये मुख्याध्यापकांचे राज्यस्तरीय कृतिसत्र

'ज्ञानेश्वर म्हात्रेंसारखा शिक्षक आमदार पाहिला नाही' - पानझडे यांचे गौरवोद्गार.....आंबोली सैनिक स्कूलमध्ये मुख्याध्यापकांचे राज्यस्तरीय कृतिसत्र

आंबोली


      महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चा व कृतिसत्राचे उद्घाटन आज सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली येथे कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते झाले. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने या कृतिसत्राचे आयोजन करण्यात आले आहे.कृतिसत्राच्या दुसऱ्या सत्रात सहाय्यक शिक्षण संचालक श्रीराम पानझाडे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, "डोंगराळ व दुर्मिळ भागातील विद्यार्थी संख्येचा प्रश्न गंभीर झाला होता. अनेक शिक्षक अतिरिक्त ठरत होते. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मंत्री उदय सामंत व नितेश राणे यांच्याकडे सतत पाठपुरावा करून, शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या दालनात बैठक घेऊन इयत्ता 9वी व 10वीची पटसंख्या 20 करण्याचा निर्णय मंजूर करून घेतला. याचा फायदा 900 पेक्षा जास्त शाळांना झाला."पानझाडे पुढे म्हणाले, "आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांसारखा शिक्षक आमदार मी अद्याप पाहिला नाही. शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, प्रधान सचिव, शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना सतत भेटून ते शिक्षकांच्या समस्या सोडवतात. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच राज्यातील सर्व शिक्षकांची कामे मार्गी लागत आहेत."पानझाडे यांनी शिक्षण क्षेत्रातील नवे बदल, शिक्षण विभागाच्या धोरणात्मक बाबी व तांत्रिक अडचणी यावर सखोल मार्गदर्शन केले. "शिक्षक, मुख्याध्यापकांच्या समस्या समजून घेऊन शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घेतले जातील. ते विद्यार्थी, शिक्षक व शासन या तिघांच्या हिताचे असतील," असे ते म्हणाले.उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे चेअरमन सुनिल राऊळ होते. मुख्याध्यापक संघाचे राज्य अध्यक्ष तानाजी माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सचिव सागर नंदकुमार, उपाध्यक्ष सचिन नलावडे, सुनील घुगरे, सुनील पंडित, माजी अध्यक्ष जे. के. पाटील, विद्या समिती सचिव संजय झांबरे, सुनील भोर, कृती सत्राचे आयोजक व जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष वामन तर्फे, सचिव घावरे सर, माजी अध्यक्ष एम. जी. मातोंडकर, कुसगांवकर सर यांच्यासह राज्यभरातील मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  दिनांक 7 व 8 जून रोजी हे कृतिसत्र आंबोली येथे सुरू राहणार आहे.