विशाल परब यांची रेडी नागोळेवाडी शाळेला आर्थिक मदत....शाळा उभारणीसाठी दिला एक लाखाचा निधी; ग्रामस्थांनी मानले आभार

विशाल परब यांची रेडी नागोळेवाडी शाळेला आर्थिक मदत....शाळा उभारणीसाठी दिला एक लाखाचा निधी; ग्रामस्थांनी मानले आभार

वेंगुर्ला

 

    रेडी नागोळेवाडी येथील प्राथमिक शाळेची इमारत सध्या अत्यंत दुरावस्थेत पोहचली आहे. आपल्या परिसरातील लहान मुलांना चांगल्या आणि दर्जेदार  सुविधा मिळाव्यात, तसेच त्यांचे प्राथमिक शिक्षण अधिक सक्षम व्हावे यासाठी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत नवीन शाळा इमारत उभारण्याचा संकल्प हाती घेतला आहे. ग्रामस्थांच्या या महत्त्वपूर्ण आणि सामाजिक उपक्रमाला महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांनी मोलाची साथ दिली असून, त्यांनी या नवीन शाळेच्या उभारणीसाठी १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.विशाल परब यांनी स्वतः रेडी नागोळेवाडी येथे भेट देऊन स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. शिक्षण क्षेत्रातील गरजा जाणून घेत त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन ग्रामस्थांच्या हाती मदतीचा धनादेश सुपूर्द केला. विशाल परब यांच्या या त्वरित आणि महत्त्वपूर्ण आर्थिक पाठबळामुळे नव्या शाळा इमारतीच्या कामाला मोठी गती मिळणार आहे. याप्रसंगी रेडीचे सरपंच भाई राणे, सागर रेडकर, संजय कांबळी, दिनेश बुगडे, शिवा सुर्याजी, परेश सुर्याजी, जयेश राणे, संजय कांबळी यांच्यासह गावातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.