वेताळ प्रतिष्ठान तुळसचे ३८वे रक्तदान शिबिर वेंगुर्ल्यात उत्साहात

वेताळ प्रतिष्ठान तुळसचे ३८वे रक्तदान शिबिर वेंगुर्ल्यात उत्साहात

वेंगुर्ले

 

     महाराष्ट्र शासन महसूल विभाग आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या निमित्ताने वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला तहसील कार्यालय येथे सलग 38वे रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले."रक्तदान हेच श्रेष्ठ दान" हा संदेश देत आयोजित केलेल्या या शिबिरास नागरिक, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.वेताळ प्रतिष्ठानच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची दखल घेत पंचायत समिती सभापती शंकर घारे, जिल्हा शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई तसेच तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या हस्ते प्रतिष्ठानचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सचिन परुळकर, रक्तमित्र संघटक महेश राऊळ, किरण राऊळ आदी उपस्थित होते. रक्तपेढी, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांच्या सहकार्याने शिबिर यशस्वीरित्या पार पडले.वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस हे गेल्या अनेक वर्षांपासून रक्तदान, आरोग्य शिबिरे, सामाजिक उपक्रम व जनजागृती अभियान राबवत आहे. सलग 38 रक्तदान शिबिरांचा टप्पा गाठत प्रतिष्ठानने समाजाप्रती आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली आहे.या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महसूल विभागाचे अधिकारी, वेताळ प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व रक्तदात्यांचे विशेष योगदान लाभले.