वायंगणी-सुरंगपाणी शाळेच्या नूतन इमारतीचे १३ फेब्रुवारी रोजी उद्घाटन
वेंगुर्ला
जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा वायंगणी-सुरंगपाणी शाळेच्या नूतन इमारतीचा उदघाटन सोहळा, माजी विद्यार्थी स्नेहमेळावा, शाळेचा वार्षिक स्नेहमेळावा व पारितोषिक वितरण समारंभ १२ व १३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा वायंगणी -सुरंगपाणी येथे होणाऱ्या या कार्यक्रमात १२ फेब्रुवारी दुपारी ३ वाजता श्री देवी सरस्वती याग कार्यक्रम होणार आहे तर १३ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता नूतन शाळेच्या वास्तूचे उदघाटन त्यानंतर संस्थापिका कै. चंपूताई वायंगणकर यांच्या तैलचित्राचे अनावरण ,पारितोषिक वितरण सोहळा,माजी शिक्षक सन्मान सोहळा, माजी विद्यार्थी स्नेहमेळावा व स्नेहभोजन सायकांळी ७ वाजता शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम होणार आहे.प्रसिद्ध उद्योजक पुष्कराज कोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या कार्यक्रमास उद्घाटक जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, वायंगणी ग्रामपंचायत सरपंच दत्ताराम दुतोंडकर, पंचायत समिती सदस्य शितल राऊत, सिद्धेश्वर सोसायटी चेअरमन प्रशांत खानोलकर, केंद्रप्रमुख सुरंगपाणी महादेव आव्हाड,पंचायत समिती वेंगुर्ला गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, वायंगणी-सुरंगपाणी शाळेच्या मुख्याध्यापिका शामल मांजरेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित कोरगांवकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा वैष्णवी पेडणेकर आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास आजी-माजी विद्यार्थी, पालक,शिक्षक व वायंगणी-सुरंगपाणी ग्रामस्थ यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शाळा शालेय मंत्री ध्रुवा पंडित व शाळा सांस्कृतिक मंत्री दिक्षा पेडणेकर यांनी केले आहे.

konkansamwad 
