तुळस येथे २८ डिसेंबर रोजी चित्रकला व रंगभरण स्पर्धा

तुळस येथे २८ डिसेंबर रोजी चित्रकला व रंगभरण स्पर्धा

 

तुळस

 

       सांस्कृतिक आणि सृजनशील कलांना प्रोत्साहन देण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस यांच्या वतीने रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता श्री रामेश्वर मंदिर, तुळस येथे खुल्या चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लहानग्यांपासून ते माध्यमिक विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना सहभागी होण्याची संधी मिळणार असून यासाठी एकूण पाच गट निश्चित करण्यात आले आहेत.
      बालवाडी आणि पहिली–दुसरी या दोन गटांसाठी रंगभरण स्पर्धा होणार आहे. इयत्ता तिसरी–चौथी गटासाठी “आवडते खेळणे”, इयत्ता पाचवी–सातवी गटासाठी “नदीकिनाऱ्याचे मंदिर”, तर इयत्ता आठवी–दहावी गटासाठी “कोकणातील कौलारू घरे” हा चित्रकलेचा विषय ठेवण्यात आला आहे. रंगभरण आणि तिसरी–चौथी गटातील स्पर्धकांनी तेलरंग अथवा स्केच पेनचा वापर करणे अनिवार्य असून पाचवी ते दहावी गटासाठी जलरंगाचा वापर बंधनकारक आहे. सर्व गटांसाठी कागद आयोजक उपलब्ध करून देणार आहेत. स्पर्धकांनी शालेय ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. गुणांकनात रंगसंगती, कल्पकता आणि सादरीकरण या निकषांना प्राधान्य दिले जाणार आहे.
     रंगभरण (दोन्ही गट) आणि तिसरी–चौथी गटातील चित्रकलेसाठी प्रथम ४४४, द्वितीय ३३३, तृतीय २२२ तसेच दोन उत्तेजनार्थ १५५–१५५ अशी मेडल व प्रमाणपत्राची पारितोषिके ठेवली आहेत. पाचवी–सातवी आणि आठवी–दहावी गटातील चित्रकलेसाठी प्रथम ५००, द्वितीय ३००, तृतीय २५० आणि दोन उत्तेजनार्थ २००–२०० अशी मेडल व प्रमाणपत्राची बक्षिसे दिली जाणार आहेत.
      स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी सागर सावंत (मो. ९१५८४५४५९५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले